Video Discription |
Tumbbad Re-release Review : तुंबाड थियेटरमध्ये जाऊन पाहण्याची ५ कारणे | Tumbbad Movie Review Marathi
मंडळी "सोजा बेटा, वरणा गब्बर आ जायेगा" अश्या आयकॉनिक डायलॉग मधून गब्बरसारख्या एका फिक्शनल कॅरॅक्टरचा दरारा निर्माण करून, त्याला अजरामर करण्याचं काम, फक्त शोले सारख्या काही अजरामर कलाकृतीच करू शकतात, आणि हे करणं अतिशय महाकठीण असतं, हेच महाकठीण काम करून दाखवलंय आपल्या मराठमोळ्या फिल्ममेकर राही बर्वेने, त्याने आपल्या तुंबाड या पिक्चरमधून "हस्तर" असा काही उभा केलाय की, थिएटर मधून तुम्ही बाहेर आला तरी तुमच्या मनात मात्र हस्तर कायमचा घर करून राहतो. हा हस्तर गब्बर सारखाच अनेकांच्या आयुष्यात आयुष्यभर आपला दरारा निर्माण करण्याची ताकद ठेवतो. मंडळी फॅन्टसी हॉरर पिरियड ड्रामा असलेला आणि 2018 मधे थिएटर मध्ये रिलिज झालेला तुंबाड हा पिक्चर आता परत थिएटर मध्ये रिलिज झाला आहे. सहा वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना इतकी उत्सुकता आहे की, तो रिलीज व्हायच्या आदल्या रात्रीच तब्बल 13000 तिकिटे ऍडव्हान्स बुकिंग मध्ये विकली गेली होती, शिवाय सध्या सगळीकडे या पिक्चरचे शोज बऱ्यापैकी हाउसफुल झालेले आहेत. भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासातील मोजक्या सर्वश्रेष्ठ चित्रपटांमध्ये समावेश होत असलेला हा पिक्चर, परत थिएटर मध्ये लागल्यामुळे हजारो प्रेक्षक सध्या त्याचा आनंद घेत आहेत. त्याचबरोबर अनेक लोक असे म्हणतात की तुंबाड ही काही ओटीटीवर किंवा मोबाईलवर बघण्याची फिल्म नव्हे, ती तुम्ही थेटरला बघितली तरच त्याची मजा तुम्हाला कळते, आणि कदाचित त्यामुळेच तुंबाड सगळीकडे सध्या हाउसफुल चाललेला आहे. मंडळी काय कारण आहे की सहा वर्षानंतर रिलीज होऊन सुद्धा, सध्या तुंबाड हा थिएटर मध्ये हाउसफुल चाललाय, शिवाय तुंबाडचे अनेक फॅन्स असे का म्हणतात की, तुंबाड हा थेटरलाच बघायला पाहिजे, यामागची प्रमुख पाच कारणे, आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
https://www.facebook.com/%E0%A4%B5%E0...
instagram link :
https://www.instagram.com/vishayachbh...
Our Website :
https://vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#tumbbad
#tumbbadmovierelease
#tumbbadrerelease
#tumbbadmoviereview
#tumbbadrereleasereview
#vishaychbhari
#विषयचभारी
tumbbad re release,tumbbad,tumbbad re release trailer,tumbbad review,tumbbad movie,tumbbad movie re release date,tumbbad re release date,tumbbad re release 2024,tumbbad re release review,tumbbad trailer,tumbbad 2 release date,tumbbad movie re release,tumbbad re release theatre date,tumbbad full movie,tumbbad movie review,tumbbad re release collection,tumbbad release,tumbbad 2 trailer,tumbbad 2,tumbbad release date,tumbad,tumbbad movie trailer |